Sugarcane Crushing : यंदाचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ऊस गाळप हंगामाची तारीख झाली जाहीर..!

 

Sugarcane Harvesting


गेल्या वर्षी उसाचा हंगाम जून पर्यंत लांबला होता. त्यामुळे यंदाही तीच वेळ शेतकऱ्यांवर येईल का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे. त्याचं कारणही साहजिकच आहे की उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. राज्याचा यंदाचा गाळप हंगाम कधी सुरू होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.


15 ऑक्टोबर पासून यंदा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले त्यामुळे साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.


 हा विषय नेमका काय आहे तेच आपण सविस्तर पाहणार आहोत.

तर सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, सहकार संघाचे सदस्य आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यावेळी उपस्थित होते.


यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केलं गेल्या हंगामात सुमारे 20 साखर कारखान्यांनी गाळप घेतला असून शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी आदर करण्यात आली आहे.


आता घरी बसल्या करता येणार उसाची नोंदणी, Maha-US Nondani नवीन ॲप आले

 

राज्याने देशात सर्वाधिक 98% एफआरपी अदा केलि या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. देशात सध्या 60 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा असून, महाराष्ट्रात 30 लाख मॅट्रिक टन साठा आहे देशातून 100 लाख मॅट्रिक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रिक टन एवढा असणार आहे.


इथेनॉल निर्मितीमध्ये देशांमध्ये महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के एवढा आहे. पुढील वर्षी 325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचं सादरीकरण दरम्यान सांगण्यात आलं.

साखर निर्यातिबाबत खुला सर्वसाधारण परवाना बाबत गेल्या वर्षीच धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी ऊस तोडणी साठी यांत्रीकरणावर भर, सह वीज निर्मिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान राज्यात गाय सह मशी मध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या रोजगारात हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करून घेणे बंधनकारक केलं जाणारे आहे. त्यासाठी बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत.


त्या बाबत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड नेमकं काय म्हणतात ते पाहूया.


राज्याचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर मध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतील. लंपी स्कीन च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावरचा आरोग्य विषयक नियोजन महत्त्वाचा राहील. त्यामुळे कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठवण्याच्या सूचना आम्ही राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. यामुळे लंपी स्किन रोग प्रतिबंधक लसीकरण काटेकोरपणे राबवण्यास मदत मिळेल.


यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टर वर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले यांना सरासरी 95 टन प्रती हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र ने गेल्या हंगामात 137 पूर्णांक 36 लाख मॅट्रिक्स टन उत्पादन केला असून उत्तर प्रदेशला मागे टाकले. यंदा चा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी 10.25 टक्के बेसिक उत्तरेसाठी प्रति मेट्रिक टन 3050 (तीन हजार पन्नास रुपये) एफआरपी देण्यात येणार आहे.

Leave a Comment