Sugarcane Harvester Subsidy: ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान | Subsidy for Sugarcane Cutting Machines

Sugarcane Harvester Subsidy: महाराष्ट्रात मागील हंगामा मधील लागवडीखालील क्षेत्र 14.88 लाख तर इतके असून 1321 लाख मराठा मध्ये झाले आहे. महाराष्ट्र मध्ये ऊस तोडणी व वाहतुकीचे कामे ऊसतोड मजुरा मार्फत केले जाते व ऊसतोड मजुरांची संख्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. शासनाने ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा तसेच रोजगार राजा संधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागामधील मजुरांचा आर्थिक व सामाजिक तसेच शैक्षणिक स्तर उंचावला आहे. या कारणास्तव मागील काही हंगामामध्ये राज्यांमधील ऊस तोडणी मजुरांची संख्या सध्या कमी होताना दिसत आहे. आयुष्यामध्ये ऊस तोडणी वेळेवर होण्यासाठी ऊस तोडणीचे काम हे ऊस तोडणी यंत्राद्वारे करणे गरजेचे आहे. या उद्देशाने ऊस तोडणी यंत्राला अनुदान (Sugarcane Harvester Subsidy) दिल्यास ऊस तोडणी ला प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांची ऊस तोडणी वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.

राज्य शासनाने ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्याकरता 22.11.2022 रोजी केंद्र शासनाकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरून केंद्र शासनाने 08.12.2022 रोजी च्या पत्रान नवे विशेष बाब म्हणून ऊस तोडणी यंत्रासाठी आर के व्ही वाय (RKVY) योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रासाठी ( Sugarcane Harvester Subsidy ) निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाने सन 2022-23 व 2023-24 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे बाबत 32 व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दिनांक 11.1.2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्याबाबत मान्यता दिली आहे.

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी उद्योजक सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपनी यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. ऊसतोड यंत्राला अनुदान ( Sugarcane Harvester Subsidy ) देण्याकरता दिनांक 20 तीन 2023 रोजी शासनाने एक शासन निर्णय घेऊन यासाठी मंजुरी दिली आहे त्या शासन निर्णयामधील काही ठळक मुद्दे आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

ऊस तोडणी यंत्र खरेदी अटी Subsidy for Sugarcane Cutting Machines

 • सदर योजने करता राज्यामधील वैयक्तिक शेतकरी उद्योजक सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या हे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदानास पात्र राहतील.
 • ऊस तोडणी यंत्र योजना राज्यस्तरी असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत म्हणजेच आर के डी वाय या योजनेअंतर्गत सन 2022-23 व सण 2023-24 या केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून राबविण्यात येणार आहे.
 • वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना ( Sugarcane Harvester Subsidy ) ऊस तोडणी यंत्र खरेदी (sugarcane harvester price) किमतीच्या 40% अथवा रुपये 35 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमे इतके अनुदान देण्यात येईल.
 • वैयक्तिक शेतकरी उद्योजक यांच्यामधील एका कुटुंबांमधील एकाच व्यक्तीस एकच ऊस तोडणी यंत्र ( Sugarcane Harvester Subsidy ) देण्यात येईल तसेच शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या याबाबत एका संस्थेत एकच ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्यात येईल.
 • ऊस तोडणी यंत्र ( Sugarcane Harvester Subsidy ) या योजनेमध्ये सहकार्य व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्र साठी अनुदान देण्यात येईल.

 • ऊस तोडणी यंत्रासाठी जो पात्र लाभार्थी होईल यांनी यंत्र किमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वतः भरावी व आवश्यक उर्वरित रक्कम ही कर्ज स्वरूपाने उभे करण्याची जबाबदारी पात्र शेतकऱ्यांची राहील.
 • ऊस तोडणी यंत्राचे अनुदान शेतकऱ्यास त्यांच्या बँक खात्यावरती पी एफ एम एस (PMFS )प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल.
 • सदर योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान मिळणे करता अर्जदाराने शासन निर्णयाच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करून भरावा.
 • एकदा लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • ऊस तोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र राज्यामध्ये करणे बंधनकारक असेल.

 • ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर आणि त्याचे अनुदान घेतल्यानंतर यंत्राला काम मिळवण्याची जबाबदारी लाभार्थ्याची असेल.
 • ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर मनुष्यबळ प्रस्थापित करण्याबाबतचे जबाबदारी यंत्र पुरवठादार यांची राहील व प्रशिक्षणाची खात्री करूनच यंत्राची खरेदी करावी.
 • अनुदान देण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्राची किमान 6 वर्ष विक्री करता येणार नाही अन्यथा देण्यात आलेल्या अनुदान रक्कम वसुली पात्र राहिलो याबाबतचे हमीपत्र लाभार्थ्यांनी साखर आयुक्तालय सादर करणे बंधनकारक असेल.
 • लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर मंजूर झालेला ऊस तोडणी यंत्रासाठी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणे ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक असेल.
 • जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांचे प्रकारचे यंत्र अवजार लाभार्थी दुसऱ्या कंपनीचे खरेदी करू इच्छित असेल तर अशा बदलास सहसंचालक यांची लेखी संमती आवश्यक असेल.
 • महाडीबीटी पोर्टलवर (mahadbt farmer) निवड झालेल्या अनुसूच जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकारी यांनी निर्मित केलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल कुटुंबामधील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Sugarcane Harvester Subsidy: ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान | Subsidy for Sugarcane Cutting Machines”

Leave a Comment