Talathi Bharti 2023: कधी होणार तलाठी भरती? या कारणामुळे तलाठी भरती लांबणीवर पडणार

Talathi Bharti: राज्यामधील 36 जिल्ह्यात सुमारे साडेचार हजाराहून अधिक तलाठी पदाची भरती होणार आहे परंतु ही भरती पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ही पण भरण्यासाठी राज्यामधील अकरा आदिवासी जिल्ह्यातील पैसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागवल्याने हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

(Talathi Bharti New Update) महाराष्ट्र राज्य मधील अकरा जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त आहे. या जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रातील बिंदू नियमावलीनुसार भरतीसाठी Talathi Bharti चर्चा सुरू आहे. या भरतीबाबत राज्यपालांनी 2019 मध्ये आदेश काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील राज्य शासनाला दिले होते. या आदेशानुसार राज्य शासनाने पेसा बाबत गेल्या महिन्यातच आदेश काढला आहे. व मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. पेसाबिंदू नामावली मध्ये काही दुरुस्त्या असल्याकारणाने बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे कमी आहेत.

या रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आणि कसे आहे यासाठी विभागीय आयुक्तालयाकडे निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय तसेच मार्गदर्शन या सर्व गोष्टी झाल्यानंतर आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतरच तलाठी भरती (Talathi Bharti 2023) बाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (Talathi recruitment will be delayed)

Talathi Bharti Question Paper मागील तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका Pdf

Talathi Recruitment 2023 राज्यामधील अकरा जिल्ह्यामध्ये आदिवासी नागरिकांची संख्या खूप जास्त आहे. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. यासाठी मार्गदर्शन देखील शासनाने मागविले आहे. त्यानंतर या भरतीबाबत कारवाई होईल सद्यस्थितीला समांतर पातळीवर पद भरती करिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर सामाजिक करार करून पुढील कारवाई केली जाईल. आणि त्यानंतर तलाठी भरतीच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाईल असे आनंद रायते अतिरिक्त आयुक्त भूमी अभिलेख विभाग यांनी सांगितले.

Leave a Comment