Tur Bajar Bhav: तुरीला मिळतोय 8 हजारपेक्षा जास्त भाव, पहा आपल्या जिल्ह्याचा तूर बाजार भाव

Tur Bajar Bhav प्रत्येक वेळी हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतमालाचे भाव पडतात. यंदा तुरीच्या बाबतीत वेगळेच चित्र दिसून येते. भरहंगामात तूर आठ हजारांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या खरिपात सततच्या पावसाने तुरीवर “मर’ येऊन अधेंअधिक क्षेत्रातील पीक जागेवर सुकले होते. त्यामुळे सरासरी क्षेत्र कमी उत्पादनात कमी आलेली असल्याने दरवाढीची शक्यता आहे.

दोन वर्षांपासून तुरीची चमक वाढतीच आहे. चार महिन्यांपूर्वी साडेसात हजारांवर असलेली तूर आता आठ हजारांपर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या खरिपात तुरीचे ११६ लाख हेक्टर क्षेत्र होते. त्यातुलनेत ‘मर’मुळे ४० हजार हेक्‍टर क्षेत्र बाद झालेले आहे. याशिवाय अति थंडीने काही भागात दवाळ गेल्याने तुरीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे.

बाजार समितीमध्ये असा मिळाला तुरीला भाव?

दिनांकप्रती क्विंटल भाव
6 फेब्रुवारी7150
7 फेब्रुवारी7150
8 फेब्रुवारी7425
11 फेब्रुवारी7652
13 फेब्रुवारी8000
17 फेब्रुवारी8274
Tur Bajar Bhav

गावरान तुरीला जिल्ह्याबाहेर जास्त मागणी

जिल्ह्यात गावरान तुरीसोबतच अन्य काही तुरीचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये गावरान तुरीला इतरत्र मोठी मागणी आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन कमी आल्याने व्यापारी सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातून नागपूर, मराठवाडा, दिल्ली, जबलपूर, कटी, बाटाबारा, सेलम यासह दक्षिण भारतात देखील तुरीला वाढती मागणी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काही प्रमाणात दरवाढीची शक्‍यता आहे.

अकोल्यात तूर सरासरी ७७०० रुपये, सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment