Weather Alert Meanings: पावसाचा रेड, ऑरेंज, यलो अलर्ट म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत

Weather Alert Meanings: राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. हवामान नेम्ह्मीच रेड अलर्ट, येल्लो अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करत असते. जे लाल, केशरी आणि पिवळे अलर्ट अशा 3 श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत. अशात या रेड, ऑरेंज, आणि यलोअलर्टचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडतच असेल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

सामान्यतः, भारतीय हवामान विभाग (IMD) हवामानाशी संबंधित माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चार रंगांचा समावेश असलेली कलर-कोड प्रणाली वापरते. (Know The Meaning of Red, Orange, Yellow, And Green Alerts) यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलो व रेड अशा रंगाचा वापर होतो. Weather Alert Meanings

Weather Alert Meanings
Weather Alert Meanings

Weather Alert Meanings

रेड अलर्टचा अर्थ काय? (Red Alert Meaning)

जेव्हा एखाद्या विशिष्ट भागात अंदाजे अत्यंत मुसळधार पाऊस किंवा गंभीर हवामान परिस्थिती असते तेव्हा रेड अलर्ट जारी केला जातो. रेड अलर्ट हा उच्च पातळीचा धोका किंवा संकट सूचित करतो आणि नागरिकांना घरामध्येच राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? (Orange Alert Meaning)

एखाद्या विशिष्ट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असताना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. म्हणजे अशा भागात कधीही नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. जरी रेड अलर्ट इतका गंभीर नसला तरी, ऑरेंज अलर्ट जारी केल्यावर नागरिकांना आवश्यक नसल्यास घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा हवामानात विविध समस्या उद्भवू शकतात.

यलो अलर्ट चा अर्थ काय आहे? (Yellow Alert Meaning)

(Yellow alert meaning weather) हवामानामुळे अनेक शहरांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी सावध राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

Weather Alert: पुढील पाच दिवस येलो अलर्ट, या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता.

ग्रीन अलर्ट अलर्ट म्हणजे काय? (Green Alert Meaning)

ग्रीन अलर्ट म्हणजे अनेक भागात पावसाळ्यात लक्षणीय पाऊस पडत नाही. हे सूचित करते की हवामानाची परिस्थिती सामान्य आहे आणि कोणत्याही निर्बंधांची आवश्यकता नाही.

2 thoughts on “Weather Alert Meanings: पावसाचा रेड, ऑरेंज, यलो अलर्ट म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत”

Leave a Comment