धान्य कोठी अनुदान योजना: शेतकरी बांधवानो, अन्नसुरक्षा अभियानांतर्गत धान्य ठेवण्याच्या कोठी साठी मिळते अनुदान, येथे करा अर्ज

By Bhimraj Pikwane

Published on:

धान्य कोठी अनुदान योजना

धान्य कोठी अनुदान योजना: शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात पिकवलेली सोयाबीन आणि धान्य साठवण्यासाठी सरकारी अनुदान मिळेल. त्याचा वापर करून शेतकरी सुमारे 500 किलो कडधान्ये किंवा धान्य साठवू शकतील. Subsidy for grain storage

धान्य कोठी अनुदान योजना: शेतकरी बांधवानो, अन्नसुरक्षा अभियानांतर्गत धान्य ठेवण्याच्या कोठी साठी मिळते अनुदान, येथे करा अर्ज

योजना काय आहे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) आणि पोषण तृणधान्ये विकास योजना 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी घटक (क्षमता मर्यादा 5 क्विंटल प्रति शेतकरी) मिळवण्यासाठी अर्ज सुरु झाले आहेत. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात (अर्जातील अटींची पूर्तता करून) अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा कृषी संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी केले आहे. gharguti dhanya kothi anudan yojana

अनुदान कोणाला मिळणार? Subsidy for grain storage sheds

अनुसूचित जाती, आदिवासी, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व इतर शेतकरी पात्र आहेत. 5 क्विंटल साठवण क्षमता असलेल्या कोठीसाठी लागू असलेला अनुदान दर खर्चाच्या 50% किंवा रुपये 2000, यापैकी जे कमी असेल ते आहे. याशिवाय एक लाखाहून अधिक अर्ज आल्यास लॉटरी काढण्यात येईल. या घटकाची खरेदी झाल्यानंतर शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यानंतर तपासणी करुन लाभार्थ्यांना डी.बी.टी. पध्दतीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान देण्यात येईल. धान्य कोठी अनुदान योजना

धान्य कोठी अनुदान योजना अर्ज कुठे करावा?

योजनेच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधावा. व या योजने विषयी सविस्तर माहिती घेऊन आपला अर्ज सादर करावा.

धान्य कोठी अनुदान योजना: शेतकरी बांधवानो, अन्नसुरक्षा अभियानांतर्गत धान्य ठेवण्याच्या कोठी साठी मिळते अनुदान, येथे करा अर्ज
धान्य कोठी अनुदान योजना

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment